Thu. May 6th, 2021

राम गोपाल वर्मांचा मोदींना सवाल

देशात पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक मारली आहे. अनेक सेलिब्रिटी ममता सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि याबद्दल आपलं मत मांडत आहेत. निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “मोदीजी, तुम्ही कालपर्यंत म्हणत होता दिदी संपल्या, आता तुम्हाला काय म्हणायचं आहे?”त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे. या आधीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा तुटवडाही भासत आहे. तसेच रुग्णांचा ऑक्सिजनविना, औषधांविना मृत्यू होत असल्याच्या घटना या समोर येत आहेत. त्यावर भाष्य करत वर्मा म्हणाले होते, “सर नरेंद्र मोदीजी, मी एक सभ्य हॉरर चित्रपट निर्माता आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे की मला तुमच्या आगामी “तिसरी लाट” या हॉरर चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या. मी मृतदेह मोजण्याच्या विभागातही काम करु शकतो. कारण, तुमच्याइतकेच मलाही मृतदेह आवडतात पण कारणं वेगवेगळी आहे”. कोरोना काळात देखील सर्व राजकीय पक्षाचं लक्ष हे निवडणुकीवर लागले होते देशात इतके जीव जात आहे. यांची काहीच गंभीरता नाही असं चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *