Thu. Oct 21st, 2021

राम गोपाल वर्मा अडचणीत, कोर्टानं बजावलं अजामीनपात्र वॉरंट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. एरव्ही आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत राहणाऱ्या, रामगोपाल वर्मांविरोधात एका चित्रपटाची कथा चोरल्याचा ठपका ठेवला आहे.

 

कोर्टाने राम गोपाल वर्माला अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. 2009मध्ये रामगोपाल वर्मांचा अज्ञात नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत औरंगाबादमधील मुश्ताक मोहसिन यांनी कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी दिग्दर्शक रामगोपाल वर्मांसह निर्माते रॉनी स्क्रूवाला विरोधातही न्यायालयाने अटक वॉरंट बजावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *