Wed. Jun 26th, 2019

अयोध्या वाद प्रकरणी मध्यस्थांना 15 ऑगस्टपर्यंतची वेळ

0Shares

सर्वोच्च न्यायालयात आज अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद वाद प्रकरणी सुनावणी झाली असून मध्यस्थांना अहवाल सादर करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये तीन मध्यस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. या मध्यस्थांच्या समितीला सर्वोच्च न्यायालयाने अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता.

नेमकं प्रकरण काय ?

रामजन्मभूमी- बाबरी मशीद वाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

या सुनावणीमध्ये मध्यस्थांना अहवाल 15 ऑगस्टपर्यंत सादर करण्याची वेळ दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने त्वरीत निकालासाठी तीन मध्यस्थांची समिती नेमण्यात आली.

या मध्यस्थांच्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश इब्राहिम खलीफुल्ला यांच्यासह आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठसमोर सुनावणी झाली.

मार् सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलून 15 ऑगस्टपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

मध्यस्थांच्या समितीने सीलबंद पाकिटात अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादक केला.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: