Fri. Feb 21st, 2020

7 दशकांच्या वकिली नंतर राम जेठमलानी यांची निवृत्तीची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

 

कायदेविषयक कायद्याचे वकील राम जेठमलानी यांनी 7 दशके वकिली केल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. 94 वर्षीय जेठमलानी यांनी निवृत्तीची घोषणा करताना आपली भ्रष्टाचार विरोधी लढाई सुरुच राहील असे स्पष्ट केले.

 

राम जेठमलानी यांनी अनेक वादग्रस्त न्यायालयीन प्रकरणे हाताळली आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेक-यांसाठी  त्यांनी न्यायालयात खटला लढवला. १६ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूची न्यायालयात बाजू मांडली होती. चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला.

 

जेठमलानी हे माजी संसद सदस्य देखील होते. भाजप सरकारमध्ये असताना भारताचा कायदेमंत्री तसेच नागरी विकासमंत्री पदाचा कार्यभारदेखील त्यांनी सांभाळला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *