Thu. Jul 9th, 2020

…अन् राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाला हातात फावडं आणि टोपलं घ्यावे लागलं

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

केंद्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये रामाचं नाव घेणारं भाजप सरकार सत्तेत आल्यामुळे रामराज्य आल्याचा दावा केला जातोय.

 

पण, वास्तवात परिस्थिती खुप वेगळी आहे. राम मंदिर बांधायाचा संकल्प करणाऱ्या भाजपच्याच राज्यात रामलीला करणंही कठिण झाले आणि खुद्द राम लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या कलाकारांना मैदान साफ करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली.

 

राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाला तुम्ही चित्रपटांमध्ये बघितलं असेल पण उत्तर प्रदेशमध्ये त्यांना चक्क हातात फावडं आणि टोपलं घेऊन साफसफाई करावी लागली.

 

मेरठमधल्या मैदानात रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होते. पण, मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी चिखल साचला होता. त्यामुळे लवकरात लवकर स्वच्छता करावी यासाठी रामलीला आयोजकांनी आमदार, खासदार आणि प्रशासनाकडे वारंवार चकरा मारल्या पण सगळ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *