Wed. Oct 27th, 2021

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास ऑक्सिजन प्लांट उभारणार

देशात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना सामाजिक संस्था, संघटनांचाही हातभार लावत आहेत. या संकटसमयी आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानेसुद्धा हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे आता अयोध्येत दोन ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार आहेत.

कोरोनाच्या संकटात देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत असून अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. केंद्र सरकारकडून ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर बंदी घालून तेथील ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळवला जात आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस सारख्या उपक्रमांमधून राज्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. तर देशातील अनेक उद्योगपतीसुद्धा स्वतःहून ऑक्सिजन पुरवठ्याची तयारी दाखवत आहेत.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने २ ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याची माहिती न्यासाचे विश्वस्त डॉ.अनिल मिश्र यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी भासणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्याच्या दृष्टीने न्यासाकडून हा निर्णय घेतला गेला आहे. अयोध्या येथील दशरथ वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात हे प्लांट उभारण्यात येणार आहे.

संपादन – सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *