भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी राम नाथ कोविंद यांचं नाव निश्चीत
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
भाजपने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे विद्यमान राज्यपाल राम नाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. उच्चविद्याविभूषित असणारे राम नाथ कोविंद हे मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत.
कानपूर परिसरातील कोरी समाजातील कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयातील्या वकिलीनंतर 1991मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यांच्यावर भाजपच्या भारतीय दलित मोर्च्चाय नेतृत्वाचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याचबरोबर दलित समाजाला कायदेशीर सहाय्यता देण्यासाठीच्या कायदा कक्षाचे ते राष्ट्रीय सरचिटणीस होते.
2015 मध्ये त्यांची बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सर्वांशी समन्वय साधून कारभार कऱण्याची कार्यशैली असणाऱ्या कोविंद यांची राजभवनातील कारकीर्द वादरहितच आहे.भाजपने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून राम नाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता ते स्वाभाविकपणे राज्यपलपदाचा राजीनामा देतील.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांनी आज त्यांच्या नावाची घोषणा करताना या कोविंद यांच्या उमेदवारीची माहिती शिवसेनेला कळवण्यात आल्याचंही सांगितलं. आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते ते औत्सुक्याचे आहे.