Wed. Oct 5th, 2022

फरार हनीप्रीत पोलिसांच्या अटकेत

वृत्तसंस्था, पंजाब

 

राम रहीम प्रकरणी चर्चेत असलेल्या हनीप्रीतला अखेर पंचकुला पोलिसांनी अटक केली आहे. एका माध्यमाशी बोलताना फरार झालेली हनीप्रीत जगासमोर आली होती. मी निर्दोष आहे, असा दावा हनीप्रीतनं केला. 

 

गुरमीत राम रहीम हे माझ्या वडिलांप्रमाणे असून, आमचे नाते पवित्र असल्याचेही ती म्हणाली. तर माझे आणि वडिलांचे नाते फार पवित्र असून, बदनामी करण्यासाठी माझ्यावर असे आरोप लावले जात असल्याचं हनीप्रीतनं म्हटलं. मला देशद्रोही म्हटल्यानं मी घाबरली आणि काही काळासाठी मी गायब झाले. मी हरियाणाहून दिल्लीला गेले होते. आता मी हरियाणा-पंजाब कोर्टात जाणार आहे.

 

रोहतकमध्ये 25 ऑगस्ट रोजी हनीप्रीत शेवटची दिसली होती. त्याच दिवशी गुरमीत राम रहीमला पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टाने दोषी घोषित केले होते आणि त्याला रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर हनीप्रीतला एका गाडीतून रोहतकमधून बाहेर पडतांना पाहिले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.