बाबा राम रहीमचे समर्थक आक्रमक
जय महाराष्ट्र न्यूज, हरयाणा
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहीमवर असलेला बलात्काराचा आरोप सिध्द झाला आहे. पंचकुलातील सीबीआय
न्यायालयाकडून निकाल देण्यात आला. बाबा राम रहीमला अटक झाल्यामुळे त्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत.
पंजाब, हरियाणात हिंसाचार उसळल्याचं पाहायला मिळालं. यात १७ जण ठार तर २०० जण जखमी झालेत. समर्थकांनी तोडफोड केली. तसंच
हरियाणातल्या आनंद विहार रेल्वेस्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका एक्सप्रेसचे २ रिकामे डब्बेही जाळले.
समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात झालेली नुकसान भरपाई डेरा सच्चा सौदाकडून वसुल केली जावी, असे आदेश हायकोर्टाने दिलेत.