Mon. Jun 1st, 2020

गुरमित राम रहिम सिंग याच्या शिक्षेचा फैसला आज

वृतसंस्था, नवी दिल्ली

 

डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांना न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. पंचकुलातील सीबीआय न्यायालयाकडून शुक्रवारी हा निकाल देण्यात

आला. गुरमित राम रहिम सिंग याच्या शिक्षेचा फैसला सोमवारी होणार आहे. दुपारी  रोहतकमधील तुरुंगात ही सुनावणी होणार असून या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि पंजाबमध्ये कडेकोट

बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  बाबा राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर सिरसा, पंचकुला या शहरांसह हरियाणा, पंजाबमध्ये मोठा धुडगूस घालण्यात आला होता. यामध्ये 38 जणांचा मृत्यू

झाला तर लाखोंच्या संपत्तीचं नुकसान झालं.

 महाराष्ट्रात विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या आगमनाची धूम सुरू असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांवर शुक्रवारी थोडासा ताण होता. तशात राम रहीमच्या प्रकरणावरून समाजकंटकांकडून कायदा आणि

सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे राज्यात बाबा राम रहीमचे समर्थक कोणकोणत्या भागात आहेत, याची तातडीने माहिती काढण्यात आली.

विशेष म्हणजे, राज्यातील नवी मुंबईसह एक दोन ठिकाणच्या बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्तींचा अपवाद वगळता राज्यातील कोणत्याही भागात राम रहीमचे मायाजाल नसल्याचे या

मोहिमेतून स्पष्ट झाले. कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पंजाब, हरियाणा आणि दिल्ली सरकारसमोर आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *