Sat. Aug 13th, 2022

भाजपाच्या दुसऱ्या मंत्र्याचा पक्षाला राम राम

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारला पुन्हा एकदा झटका बसला आहे. भाजपचे मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांच्यानंतर आता भाजपमधील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. भाजपचे मंत्री दारा सिंह चौहान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

गेल्या २४ तासांमध्ये भाजपच्या दुसऱ्या मंत्र्यानी रामराम ठोकला आहे. भाजप मंत्री दारा सिंह चौहान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून उत्तर प्रदेशात फोडोफोडीचं राजकारण सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपमधील नेते राजीनामा देत आहेत. योगी सरकारमधील मंत्री दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये वन, पर्यावरण आणि उद्यान मंत्री म्हणून मी काम केले आहे. मात्र सरकारने दलित, वंचित, शेतकरी आणि बेरोजगारांची घरे उपेक्षा करण्यात आली. त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले.’

1 thought on “भाजपाच्या दुसऱ्या मंत्र्याचा पक्षाला राम राम

  1. Wonderful post. I learn something totally new on different blogs everyday. It is stimulating to see content from other writers and practice a little something there. I want to use some on this content on my blog you will be mind. Natually Ill make a link returning to site. Appreciate sharing.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.