Sun. Aug 18th, 2019

‘रामायण’, ‘महाभारत’ हे हिंदूंच्या हिंसक असण्याचे पुरावे!- येचुरी

0Shares

CPM या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी रामायण आणि महाभारत हे ग्रंथ हिंदू हिंसक असल्याचं सिद्ध करत असल्याचं वक्तव्य केलं आहे. गुरुवारी भोपाळच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर भोपाळचे महाआघाडीचे उमेदवार दिग्विजय सिंग हेदेखील उपस्थित होते.

काय म्हणाले येचुरी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक एकीकडे ‘रामायण’, ‘महाभारत’ ग्रंथांना पवित्र मानून त्यांची उदाहरणं देत असतात.

तरीही ते म्हणत असतात की हिंदू धर्म हिंसक नाही.

ही दोन्ही विधानंच परस्परविरोधी असून त्यात काही लॉजिक नाही.

RSS आपली स्वतंत्र सेना निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र महाआघाडी मोदींना सत्तेमध्ये पुन्हा येऊ देणार नाही.

हे युद्ध संविधानाच्या रक्षणासाठी- दिग्विजय सिंह

भाजपचा संविधानावर विश्वास नाही. त्यांनी संविधानाचा ‘तमाशा’ बनवून ठेवलाय.

यंदाची लोकसभा निवडणूक ही संविधानाच्या रक्षणासाठी होत असलेलं युद्ध आहे.

हे युद्ध माणसा माणसांतलं नसून ही विचारधारांमधील लढाई आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *