Sat. Dec 14th, 2019

“मायावती यांचा हत्ती उपाशी…”- रामदास आठवले

वंचित समाजाला न्याय हवा असेल आणि सत्तेत राहायचं असेल, तर त्यांनी माझ्यासोबत यावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. औरंगाबादमध्ये आयोजित मराठवाडा विभागीय महामेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेलं दलित ऐक्य काही नेत्यांच्या गटबाजीमुळे होत नसल्याची टीका त्यांनी केली.

ऐक्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि न येणाऱ्यास समाजाने दूर करावं असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं.

भाजपा आणि शिवसेनेने पुढील निवडणुकांसाठी युती करावी असा सल्ला त्यांनी पुन्हा एकदा दिला.

कोट्याचा विचार न करता लोकसभेसाठी आम्हाला दोन जागा द्याव्या, अशी मागणी आठवले यांनी केली

दक्षिण मुंबईच्या जागेवर लोकसभेची निवडणुक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

“मायावती यांचा हत्ती उपाशी”

मायावती यांचा हत्ती उपाशी आहे. त्यांनी आमच्यासोबत यावं असं आवाहन आठवले यांनी केलं.

विधानसभेसाठी त्यांनी युती केल्यास 10 ते 15 जागा आम्हाला द्याव्यात

युती न झाल्यास 20 जागा द्याव्या, अशी मागणीही त्यांनी केली.

यापैकी मराठवाड्यात 4 ते 5 जागांची मागणी केली.

हे ही वाचा- “सत्ता कशी मिळवायची हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं”

तीन तलाक विरोधी कायद्याला कॉंग्रेसचा विरोध का?

समाजातील महिलांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी या कायद्याची गरज असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केलं.

राहुल गांधीना राफेल शिवाय काहीच सुचत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने यांवर अगोदरच कोणताही भ्रष्टाचार न झाल्याचा निर्वाळा दिलाय.

तरीही पंतप्रधान चौकीदार नही भागीदार असल्याचा अपप्रचार काँग्रेस पक्ष करत असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितले.

 

दलाली बंद झाल्यामुळेच महागठबंधन- दानवे

कधीकाळी सत्तेत असणाऱ्यांची दलाली बंद झाल्यामुळे दलाली खाणाऱ्या पक्षांनी आमच्याविरोधात महागठबंधन केलंय.

हे सरकार घटना बदलणार असल्याचा दुष्प्रचार विरोधी पक्ष करत आहे.

संविधान आमच्यासाठी सर्वोच्च ग्रंथ आहे.

भाजपा हा जातीयवादी पक्ष असल्याची टीका शरद पवार, ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू सारखे नेते करतात.

परंतु हेच नेते कधीकाळी भाजपा बरोबर सत्तेत सहभागी होते.

हे नेते सत्तेसाठी संधीसाधू आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाने दोनदा निवडणुकीत पराभूत करण्याचं पाप केलंय.

ते आता कोणत्या तोंडाने दलितांची मतं मागत आहे असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *