Mon. Dec 6th, 2021

मराठी टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करू- आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) याचे अध्यक्ष रामदास आठवले शहरप्रमुख अंकुश गायकवाड यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपण दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेच्या कोट्यातील जागेतून निवडून येण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं.

म्हणून मराठी टक्का कमी झाला!

मुंबईमधून मराठी टक्का कमी झाल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे.

मराठी टक्का जरी मुंबईतून घसरत चालला असला, तरी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तो परत वाढविण्याचा प्रयत्न करू.

जी कामं आपण करीत नाहीत ती कामं इतर भाषक लोक इथे येऊन करतात.

त्यामुळे मराठी टक्का कमी पडलाय

हे ही वाचा- “मायावती यांचा हत्ती उपाशी…”- रामदास आठवले

2020 च्या आधी आंबेडकरांचं स्मारक बनणार

2020 च्या आधी इंदू मिल मधील जागेत डॉ. आंबेकरांचं स्मारक बनेल.

3600 कोटी रुपये खर्चून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनणार आहे.

350 फुटाची बाबासाहेबांची मूर्ती इथे उभी असणार आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.

 

माझेही मोदींशी चांगले संबंध

रवींद्र चव्हाण 3 वेळा याच प्रभागातून निवडून आले आहेत.

चव्हाणांचे मुख्य़मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत.

मात्र त्य़ांचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध असतील, तर माझे पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध आहेत

अशी आठवले यांनी चव्हाणांना कोपरखळी मारली.

 

गडकरींच्या पंतप्रधानपदालाही आमचा पाठिंबा

देशाचे पंतप्रधान मोदीच होणार

मोदी आणि गडकरी या दोघांमध्ये कसलाही वाद नाही.

जर गडकरींना पंतप्रधान करायचं असल्यास तो निर्णय भाजप घेईल.

आमचा भाजपच्या निर्णयाला पाठिंबा असेल

 

शिवसेनाभाजप युतीसाठी प्रयत्नशील

युती होण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत.

भाजपच्या मागे आरपीआय पक्ष उभा असणार आहे.

दोन्ही पक्ष एकत्र येणं अत्यंत महत्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *