Thu. Jan 27th, 2022

दशरथासि दाशरथी पुत्र जन्मला- रामनवमी विशेष

चैत्र शुद्ध नवमीचे हिंदू पंचांगामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र महिन्यामधल्या हा नवरात्राचा नववा दिवस मानला जातो. भगवान विष्णूचा सातवा अवतार मानला जाणाऱ्या त्रेता युगातला रामाचा आज जन्मदिवस आहे. यामध्ये मध्यान्हाला रामजन्माचा सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे पूजन, गीत रामायणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. अयोध्या, सीतामढी या उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत हा सोहळा साजरा केला जातो.

दशरथासि दाशरथी पुत्र जन्मला

श्रीराम हे सगळ्यांचेच लाडके दैवत असून रामजन्माच्या दिवशी रामजन्माच्या पाळण्याला खूप महत्त्व आहे.

रामनवमीच्या दिवशी मंदिरामधून भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन यातून श्रीरामाच्या नावाचे स्मरण केले जाते. यावेळी पूजा-अर्चा करणे पुण्याचे मानले जाते.

रामनवमीच्या दिवशी गीतरामायणामध्ये रामाचा महिमा पाहायला मिळतो.

श्रीरामाच्या प्रतिमेला हारासोबत गाठी (साखरेच्या पाकापासून तयार केलेले )वाहण्याची प्रथा आहे.

श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली, जाईच्या फुल वाहण्याला यादिवशी अधिक महत्व दिले जाते.

रामाचा जन्म झाला तेव्हा आपण दुष्टदुर्जनांच्या छळातून मुक्त झालो, या विचारातून या सणाला महत्त्व आहे.

रामाचा जन्म हा पुनर्वसु नक्षत्रावर चैत्र मध्यान्ही झाला आहे. असं म्हणलं जातं.

दाशरथी म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, या दशेंद्रिये ताब्यात ठेवणाऱ्या रामदेवतेला साष्टांग नमन…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *