Tue. Aug 20th, 2019

विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांवर अविश्वास ठराव आणणार – चंद्रकांत पाटील

अर्थसंकल्प फुटल्याच्या मुद्यावरुन विधानपरिषदेत एकच गदारोळ झाला. त्यावरुन सभापतींवर अविश्वास ठराव आणणार असल्याचं विधानपरिषद नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

0Shares

अर्थसंकल्प फुटल्याच्या मुद्यावरुन विधानपरिषदेत एकच गदारोळ झाला. त्यावरुन सभापतींवर अविश्वास ठराव आणणार असल्याचं विधानपरिषद नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पाच भाषण १५ मिनीटे थांबवल्याने विधानपरिषदेचे सभापती रामराजे निबांळकर यांच्याविरुध्द सत्ताधारी पक्ष अविश्वास प्रस्ताव दाखल करणार आहे.

निंबाळकरांवर अविश्वास ठराव का?

विधानपरिषदेत अर्थराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी अर्थसंकल्प माडंत होते.

मात्र बजेट फुटल्याचा मुद्दा विरोधीपक्ष नेते धनजंय मुंडे यांनी उपस्थित केला.

त्यावर सभापतींनी अर्थसंकल्पाच भाषण १५ मिनीटे थांबवल. त्यानंतर सभापतींनी सर्व सदस्यांना आपल्या दालनात बोलावलं.

सभापतींच्या या कृतीला विधानपरिषदेचे नेते चंद्रकांतदादा पाटील विरोध केला.

सभापती पक्षपातीपणा करताहेत, एकाच पक्षाला झुकतं माप देताहेत असा आरोप चंद्रकांत दादा पाटील यानी केला आहे.

सत्ताधारी पक्ष लवकरचं सभापतीविरोधात अविश्वास ठराव मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे लवकरचं रामराजे निबांळकर  यांच्याविरुध्द अविश्वास ठराव येणार असल्याचं चित्र आहे.

यापूर्वीही सभापती शिवाजीराव देशमुख यांना अविश्वास ठरांवाद्वारे सभापती पदावरुन हटवण्यात आलं होतं.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *