Wed. Oct 5th, 2022

राणा दाम्पत्याला जामीन मंजूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या अट्टाहसापोटी राणा दाम्पत्याला कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज राणा दाम्पत्याच्या जामिनावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या जामीन मंजूर केल्यामुळे अखेर १२ दिवसांनंतर त्यांची कोठडीतून सुटका होणार आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला आहे. न्यायालयाने अटी-शर्तींसह त्यांना जामीन मंजूर केला आहे.

काय आहेत अटी-शर्ती?

  • राणा दाम्पत्याने पुन्हा कायदा हातात घेऊ नये.
  • माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये.
  • पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावावी.
  • अटी पाळल्या नाही तर जामीन रद्द होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण?

राणा दाम्पत्याने शनिवारी (२३ एप्रिल) मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मुंबईत दाखल झाले होते. मात्र, राणा दाम्पत्याच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला होता. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीसमोर पोहचता आले नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. मात्र, घडल्या प्रकरणाच्या परिणामी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती. यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता त्यांची १२ दिवसांनी कोठडीतून सुटका होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.