Thu. Sep 29th, 2022

राणा दाम्पत्य नजरकैदेतून मुक्त

आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विनापरवानगी पुतळा उभारल्यानंतर अमरावतीमध्ये राजकारण तापले होते. प्रशासनाने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. मात्र, आता त्यांच्या घराजवळ कोणत्याही प्रकारे पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने रविवारी उशीरा त्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे.

आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला आहे. आमदार रवी राणा यांनी कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले. तसेच अमरावतीच्या महापौरांनी बैठक घेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अधिकृत परवानगी  देण्याची मागणी रवी राणा यांनी केली होती.

मात्र रवी राणा यांनी अनधिकृतरित्या उभारलेल्या पुतळ्यावर प्रशासनाने कारवाई केली आहे. दरम्यान रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या घराजवळ पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र राणा दाम्पत्यांच्या घराबाहेरील पोलीस हटवण्यात आले असून त्यांना नजरकैदेतून मुक्त करण्यात आले आहे.

2 thoughts on “राणा दाम्पत्य नजरकैदेतून मुक्त

  1. I was looking for some good blog post about this issue . Searching in Yahoo I managed to find this great site. After reading this information Im really glad to say that I most definatelly found just what I was looking for. I will make sure to remember this website and come back here on a constant basis. Thanks!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.