Wed. Jan 19th, 2022

प्राध्यापकाचं ब्लॅकमेलिंग, कॉलेजच्या 16 विद्यार्थीनींचं केलं लैंगिक शोषण

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

बीडमध्ये प्राध्यापकानंच कॉलेजच्या विद्यार्थीनींचं लैंगिक शोषण केल्याच समोर आलं. विठाई नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक राणा डोईफोडेंविरोधात 16 विद्यार्थिनींनी तक्रार केली.

 

प्रात्यक्षिकाचे गुण वाढवून देण्यासाठी राणा डोईफोडे ब्लॅकमेलिंग करत असल्याचं या विद्यार्थ्यांनी म्हटलं. दरम्यान राणा डोईफोडेला विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये घेराव घातला.

 

त्यानंतर पोलिसांनी डोईफोडेला ताब्यात घेतलं. तरीही संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांची गाडी अडवली आणि डोईफोडेला गाडीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

 

दरम्यान, ज्या प्राध्यापक राणा डोईफोडेवर लैंगिक शोषणचा आरोप करण्यात आला. त्याचा महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुडें यांच्यासोबतही फोटो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *