रणबीर-आलिया अडकले विवाहबंधनात

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचे विवाहसोहळे सध्या पार पडत आहेत. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. तर आता बॉलिवूडची समाजमाध्यमांवर बहुचर्चित असलेली जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट आज १४ एप्रिल रोजी लग्नबेडीत अडकले आहेत. बांद्रा येथील पाली हिल मधील ‘वास्तू’ बंगल्यावर त्यांचा विवाहसोहळा विधिवत संपन्न झाला.
कपूर कुटुंबाची सून होण्यासोबतच आलिया भट हिला बांद्रा येथील कपूर घराण्याचे नवे घर ही भेट मिळणार आहे. बुधवारी १३ एप्रिल रोजी आलिया आणि रणबीरचा मेहंदी सोहळा जोरदार रंगला तर या सोहळ्याला प्रतीक कुहाडने हजेरी लावल्याचं म्हंटलं जातंय. बुधवारी दुपारपासून सुरु झालेल्या हा विवाहसोहळा मित्रमंडळी आणि काही नातेवाईकांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला आहे, तर लग्नानंतर ‘ताजमहाल पॅलेस’ मध्ये ते ग्रँड रिसेप्शन देणार असल्याचं सांगितलं जातंय.