रणबीर कपूरचा पहिला चित्रपट, तब्बल 17 वर्षांनी झाला प्रदर्शित ऑस्करमध्येही मिळाले होतं नामांकन!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याच्या चाहत्यांची यादी फार मोठी आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटात रणबीर कपूरने काम केलं आहे. रणबीरचे अनेक चित्रपट हे हिटही झाले आहे. अनेकांना माहिती आहे की, रणबीर कपूरचा पहिला चित्रपट हा ‘सांवरिया’ आहे. मात्र हे चुकीचं असून रणबीर कपूरने ‘सांवरिया’ चित्रपटापुर्वी ‘कर्मा’ या शॉर्ट फिल्मसाठी काम केलं होतं. 2004साली रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माता बी.आर.चोप्रा यांचे नातू अभय चोप्रा यांनी दिग्दर्शन केलं होतं. आपल्या कुटुंबाप्रमाणेच रणबीरने देखील मनोरंजन विश्वाचा मार्ग धरला आणि आपल्या कारकीर्दीत अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. रणबीरने 2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ (Saawariya) चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण हा त्याचा पहिला चित्रपट नव्हता. या चित्रपटाच्या आधी देखील रणबीरने एका चित्रपटात काम केले होते. फार कमी लोकांना याबद्दलची माहिती आहे. सध्या रणबीर कपूर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फार सक्रिय नाही, तरी तो केवळ चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. ‘कर्मा’ चित्रपटादरम्यान रणबीर कपूर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होता. या चित्रपटाला स्टुडंट ऑस्करसाठीही नामांकन देण्यात आले होते. रणबीरची ही शॉर्ट फिल्म केवळ 26.39 मिनिटांची होती, यात रणबीर कपूर व्यतिरिक्त शरद सक्सेना, मिलिंद जोशी, सुशोवन बॅनर्जी सारख्या कलाकारांनी अभिनय केला होता. लवकरच रणबीर हा ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीर हा पहिल्यांदाच आलिया भट्टसोबत एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर आणि आलिया एकमेकांच्या जवळ आले होते. आता दोघांनीही त्यांचे प्रेम उघडपणे मान्य केले आहे. शिवाय लवकरच हे जोडपे लग्नही करणार आहेत.

Exit mobile version