Mon. Jun 14th, 2021

रणबीरची नेटफ्लिक्सवर दमदार एन्ट्री…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाऊन तसंच कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशाची परिस्थिती फार गंभीर आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीत देखील अनेकांनी चित्रीकरण थांबलेलं आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपट प्रदर्शित होत नसल्यानं अनेकांचे नुकसान होत आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा मनोरंजनासाठी ओटीटीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे अनेक कलाकार डिजीटल माध्यमांकडे वळत आहेत. नेटफ्लिक्सने आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन रणबीरचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रणबीर लवकरच भेटू असंही म्हणत आहे. आता यामुळे त्याचे चाहते त्याला डिजीटल प्लॅटफॉर्मवर पाहण्यास चांगलेच उत्सुक आहेत. या व्हिडिओमध्ये रणबीर नेटफ्लिक्सबद्दल माहिती देत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “नेटफ्लिक्सवर आहे अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स, कार्टून…म्हणजे पूर्ण परिवारासाठी संपूर्ण मनोरंजन. आत्ता तुम्ही सगळे व्यस्त आहात…भेटूया क्रिकेटनंतर!”

त्याच्या या व्हिडिओनंतर तो लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार असं वाटत आहे. रणबीरचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या असून एक युजर म्हणतो, “हे खरं व्हायला हवं”. तर अजून एक युजर म्हणतो, “रणबीर, प्लीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण कर” तर अनेक युजर्सनी हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. रणबीरचा आगामी चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अलिया भट दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *