Sun. Jun 20th, 2021

रणबीर कपूरला कोरोणाची लागण….

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाची लागण अनेकांना झाली आहे. आता या यादीत आणखी एक बॉलिवूड अभिनेत्याचे नाव जुळले आहे. काही वेळापूर्वीच अभिनेता रणबीर कपूरची तब्येत खराब असल्याचं त्याचे काका रणधीर कपूर यांनी सांगितलं होतं.
रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. शिवाय सध्याला रणबीरला घरीच विलगीकरणात ठेवले आहे. रणबीरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं अनेक चाहत्यानी लवकर बरा व्हा असं रणबीरला कमेंट केल्या आहे. मात्र आतापर्यत रणबीरला कोरोनाची लागण झाल्याचं कन्फर्म नव्हतं. यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. रणबीरवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु असल्याचंही नीतू कपूर यांनी सांगितले. रणबीर सध्या अभिनेत्री आलिया भटसोबत ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. रणबीरने आपल्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण केले आहे. शिवाय ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. रणबीरने ‘शमशेरा’ आणि ‘ऍनिमल’लव रंजनच्या एका चित्रपटात दिसणार आहे ज्याचं नाव अजून निश्चित झालेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *