नितीन गडकरींच्या स्वागतासाठी नारायण राणेंनी लावलेल्या बॅनरवरुन सोनिया आणि राहुल गांधी गायब
जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी नारायण राणेंकडून बॅनरबाजी करण्यात आली.
पण, या बॅनरमुळे नव्या चर्चांना उधाण आले. कारण या बॅनर्सवर कुठंही काँग्रेसचा उल्लेख नाही.
तसेच नेहमीच्या रितीरिवाजानुसार काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी किंवा उपाध्यक्ष राहूल गांधी यांचाही फोटो नाही. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा पुन्हा
एकदा रंगू लागल्या आहेत.