Jaimaharashtra news

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये 23 जूनला हा योग जुळून येणार आहे. सिंधुर्गमध्ये मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे.

 

या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमपत्रिकेत उद्धव ठाकरेंचंही नाव आहे, तसंच नारायण राणेंनाही निमंत्रण देण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरे-राणे यांचा एकत्र येण्याचा हा योग जुळून येणार का?

Exit mobile version