Fri. Sep 30th, 2022

राणेंची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यातील बांधकाम बेकायदा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दोन आठवड्यात बंगल्यातील बांधकाम पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. याप्रकरणी राणेंना उच्च न्यायालयाने १० लाखांचा दंड ठोठावला आहे.एफएसआय आणि सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा ठपका नारायण राणेंवर ठेवण्यात आला आहे.

एमआरटीपी कायद्याच्या कलम ४४ अंतर्गत बेकायदेशीर बांधकाम रेगुलर करण्याचा त्यांचा अर्ज बीएमसीने फेटाळल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे नारायण राणे यांना झटका बसला आहे.

अधीश बंगला बेकायदा बांधकामप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेली याचिका गुरुवारी फेटाळण्यात आली. याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला असून दाद मागण्यासाठी सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जिल्हा समितीकडे जाण्याच्या सूचना न्यायालयाने राणे यांना केल्या आहेत.

1 thought on “राणेंची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.