Thu. Sep 29th, 2022

बिग बॉस मराठीमध्ये रंगला ‘इच्छा माझी पुरी करा’चा खेळ

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी (colours marathi) वाहिनीवर प्रसारित होतो. बिग बॉसच्या घरामध्ये नव्याने एंट्री झालेल्या आजीने घरामध्ये जादूचा दिवा ठेवला आणि “इच्छा माझी पुरी करा” या नेमणूक (Nomination) कार्यांतर्गत सदस्यांना एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी दिली. या कार्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी संतोष चौधरी, विकास पाटील, आदिश वैद्य आणि मीनल शाह नॉमिनेट झाले.

तसेच “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य सुद्धा रंगतेय. जो एक सदस्य सर्व फेर्यां मध्ये भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरेल, तो सदस्य कॅप्टन पदाचा पहिला उमेदवार ठरणार आहे.”इच्छा माझी पुरी करा” या नॉमिनेशन कार्यात आदिश वैद्यने आविष्कार दारव्हेकरला वाचवले. ज्यावरून विकास, सोनाली, मीनल आणि विकास यांची जोरदार चर्चा रंगली.

पाठीत खंजीर खुपसणे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नित्याचे आहे. कधी कोणावर विश्वास ठेवावा याबाबत सदस्य संभ्रमात असतात. कोण आपल्या बाजूने खरंच आहे आणि कोण असल्याचा आव आणत आहे हे हळूहळू काही काळ गेल्यानंतर कळतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.