रनिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

रनिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान झाले आहेत. रनिल विक्रमसिंघे यांनी गुरुवारी श्रीलंकेच्या वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता पंतप्रधान मंत्रीपदाची शपथ घेतली. महिंदा राजपक्षे यांच्या पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर रनिल विक्रमसिंघे यांच्याकडे श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत रनिल विक्रमसिंघे?
रनिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातात. रनिल विक्रमसिंघे हे युनायटेड नॅशनल पक्षाचे प्रमुख आहेत. तसेच ते आतापर्यंत चारवेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत.
विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पक्षाला गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या पक्षाला निवडणुकीतून एकही जागा मिळाली नव्हती. पण त्यांच्या पक्षाला श्रीलंकेच्या संसदीय प्रणालीप्रमाणे राष्ट्रीय यादीनुसार एक जागा मिळाली होती. दरम्यान, आज श्रीलंकेचे नवे पंतप्रधानपद म्हणून रनिल विक्रमसिंघे यांनी शपथ घेतली आहे.