Jaimaharashtra news

गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांची दादागिरी; भाऊसाहेब देशमुख विद्यालयात कर्मचाऱ्याला अश्लील शिविगाळ करीत श्रीमुखात भडकवली

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

 

राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून गृह, नगरविकास, कौशल्य विकास यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी

डॉ. रणजित पाटील यांच्याकडे दिली.

 

राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडिल माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी घुंगशी येथील भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन कुठलाही अधिकार

नसताना तपासणीचा प्रयत्न केला.

 

तसेच तेथील कर्मचाऱ्याला अश्‍लील शिविगाळ करीत मारहाण केली. यासंबंधीची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने डॉ. रणजित पाटील यांच्यासमोरच्या

अडचणी वाढल्या आहेत.

Exit mobile version