माढयातून रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपाचे उमेदवार

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून माढाचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यात भाजपाचा उमेदवार कोण हा प्रश्नही होता. राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती. तर त्यांचे वडील खासदार विजयसिंह मोहिते यांनी ही निवडणूक लढण्याची तयारी दाखवली होती. सव्वा दोन महिन्यापूर्वी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याही नावाची चर्चा झाली. अखेर भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर ?
रणजित सिंह यांना सव्वा दोन महिन्यापूर्वी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले होते.
स्वराज दूध संघ आणि हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वतःची राजकीय ताकद वाढवली.
रणजितसिंह यांचे वडील हिंदुराव शिवसेनेचे माजी खासदार होते.
फलटण नगपालिकेत रणजितसिंह यांच्या पुढाकारात नऊ नगरसेवक निवडून आले होते.
सातारा जिल्हा परिषदेत त्यांचा एक सदस्यही आहे.
माढा मतदारसंघात भाजपाने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्याविरूद्ध नाईक-निंबाळकर यांची लढत होणार आहे.