Wed. Jun 19th, 2019

रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपात प्रवेश करणार

72Shares

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आता कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व पदावरून राजीनामा दिला आहे. तसेच सोमवारी निंबाळकर भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश घेणार आहे.

निंबाळकर भाजपात प्रवेश करणार  –

आगामी निवडणुका काही दिवसातच असताना कॉंग्रेल-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश केला आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, भारती पवार, प्रवीण छेडा अशा अनेक नेत्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला.

शनिवारपासून कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर नाराज असल्याची माहिती समोर येत होती.

मात्र त्यांनी सर्व पदावरून राजीनामा दिला आहे.

तसेच सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.

मात्र काही दिवासांपूर्वीच कॉंग्रेसने निंबाळकर यांना सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र काही कारणांवरुन नाराज असल्याने पक्ष सोडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादीला आगामी निवडणुकांत याचा मोठा फटका बसणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

72Shares

Leave a Reply

%d bloggers like this: