Thu. May 6th, 2021

डिसले गुरूजींच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने महाराष्ट्राच्या ग्रामीण गुणवत्तेची पताका आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकविणाऱ्या रणजितसिंह डिसले यांच्या नावाने आता थेट इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या पुरस्कारातील काही रक्कम त्यांनी इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांना दिली होती. त्या रक्कमेतून इटलीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ४०० युरोची (३६ हजार रुपये) शिष्यवृत्ती देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

डिसले गुरुजींची गुणवत्ता, शिक्षण प्रसाराविषयी आस्था लक्षात घेऊन इटली सरकारने त्यांच्या नावे आपल्या देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले रणजितसिंह डिसले यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये सात कोटींचा ग्लोबल टीचर ॲवार्ड जिंकला. मात्र, हा पुरस्कार जिंकल्यावर त्यांनी पुरस्काराची एवढी मोठी रक्कम शिक्षण प्रसारासाठीच वापरण्याची घोषणा केली. त्यासाठी अर्धी रक्कम म्हणजे साडेतीन कोटी अंतिम फेरीतील अन्य नऊ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले होते. त्यानुसार अंतिम फेरीतील इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांनाही रक्कम देण्यात आली. आता इटलीतील सॅमनिटे सरकार मझोने यांना मिळालेल्या रक्कमेतून इटलीतील गुणवंत विद्यार्थ्यांना ४०० युरोची (३६ हजार रुपये) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *