Sun. May 9th, 2021

रानू मंडल यांना प्रसिद्धी मिळताच 10 वर्षांनंतर परतली मुलगी

‘एक प्यार का नगमा है’ या गाण्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रानू मंडल या आता स्टार झाल्या आहेत. रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन  उदरनिर्वाह करणाऱ्या रानू यांचं गाणं ऐकून त्यांना अनेक रिअॅलिटी शोंमध्ये बोलवण्यात आलं. तर Bollywood चे दरवाजेही त्यांच्यासाठी उघडले. संगीतकार गायक हिमेश रेशमियाने त्यांच्याकडून पार्श्वगायन करून घेतलं. त्यांना चक्क 6 ते 7 लाख रुपये मानधनही दिलं. त्यानंतर  तब्बल दहा वर्षानंतर रानू यांची मुलगी त्यांच्याकडे परतली आहे.

रानूंची आणि त्यांच्या मुलीशी दहा वर्षांत भेट झाली नव्हती.

पण व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे दोघी मायलेकींची पुन्हा भेट झाली.

माझी मुलगी परत आल्यामुळे खूप आनंद झाला असून माझ्या दुसऱ्या आयुष्याला सुरुवात झाल्याची भावना रानू यांनी व्यक्त केली

मात्र सोशल मीडियावर आता त्यांच्या मुलीवर टीका होऊ लागली आहे. पैसा आणि प्रसिद्धी मिळताच मुलीने आईकडे धाव घेतल्याचा आरोप नेटिझन्स करत आहेत.

रानू यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या अतिंद्र चक्रवर्ती या तरूणाने टीकांवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, आज मी खरंच खूप खूश आहे. केवळ देवच जाणतो की, मी का खूश आहे? पैसा आयुष्यात खूप मोठी गोष्ट नाहीये. माझ्या एका व्हिडीओमुळे रानू आज आपल्या मुलीला परत भेटली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *