Sun. Aug 18th, 2019

कसा असेल दीप-वीरचा शाही विवाह सोहळा? जाणून घ्या

0Shares

बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती दीपिका-रणवीरच्या लग्नाची या दोघांचा विवाह सोहळा इटलीतील लेक कोमो परिसरात पार पडणार आहे. मात्र दीपवीरचा हा विवाहसोहळा कसा असेल आपल्या लग्नात दीपिका कोणत्या रंगाचा लेहंगा परिधान करणार आहे याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. दीपिका आणि रणवीर सिंहचा विवाह सोहळा एखाद्या परीकथेपेक्षा कमी नसणार, इटलीचे लेक कोमो हे निसर्गरम्य ठिकाण दीपवीरच्या लग्नासाठी सज्ज होतंय. तिथे मंडप बांधायची तयारी सुरू झाली आहे.

lake_como.jpg

दीपिका रणवीरचे कुटुंब लग्न ठिकाणी पोहचले आहे. दीपिका-रणवीरच्या विवाह सोहळ्याआधी 13 नोव्हेंबरला म्हणजेच आज मेहंदी आणि संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तर 14 तारखेला कोकणी पद्धतीनं लग्न केलं जाईल. दीपिका कन्नड कोकणी आहे त्यामुळे तिच्या पद्धतीने हे लग्न होईल आणि त्यानंतर 15 तारखेला सिंधी पद्धतीनं लग्न समारंभ केला जाणार आहे. या विवाह सोहळ्यात दीपिका आणि रणवीर यांचा पोषाख काय असेल याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

विवाह सोहळ्यानंतर 21 नोव्हेंबरला बंगळुरुत रिसेप्शन होणार आहे. तर 28 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन सोहळा पार पडेल. मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अनुष्काने आपल्या लग्नात गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्याची चांगलीच चर्चा झाली होती, तर सोनम कपूरने आपल्या विवाहसोहळ्यात लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता, मात्र दीपवीरच्या लग्नात दीपिकासाठी डिझाईनर सब्यसाचीने कोणता रंग निवडलाय हे पाहण महत्वाचं आहे.

 

anushkanadsonam.jpg

 

गेल्या आठवड्यातच दीपिकाच्या बंगळुरुच्या घरी नंदी पूजा झाली. त्यानंतर रणवीरचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. तर रणवीर आणि दीपिकाने बॉलिवूडमधील जवळच्या मित्रमंडळींच्या घरी जाऊन लग्नाचं आमंत्रण दिलं. त्यानंतर 9 तारखेला दीपिका आणि रणवीर एकत्र इटलीला रवाना झाले, तेथील लेक कोमोमध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नासाठी स्वित्झर्लंडमधून स्पेशल शेफ बोलावण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यात साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन अशा दोन्ही जेवणांचा यात समावेश असेल.

 

lake_como2.jpg

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *