Thu. May 23rd, 2019

रणवीर-दीपिकाच्या संगीत सोहळ्यात फूल 2 धमाल

0Shares

रणवीर सिंह-दीपिका पदुकोण यांचा शाही विवाह सोहळा आज इटलीतल्या लेक कोमो या निसर्गरम्य ठिकाणी पार पडणार आहे. आज कोकणी पद्धतीनं लग्न होईल तर उद्या सिंधी पद्धतीनं लग्न होणार आहे. लेक कोममधल्या ‘विला दे बाल्बिनेलो’ या पॅलेसमध्ये हा सोहळा होणार आहे.

या शानदार सोहळ्याचे फोटो किंवा व्हिडिओ अद्याप समोर आले नाहीत. मंगळवारी लग्नाच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली त्यात कोंकणी पद्धतीनं एन्गेजमेंट अर्थात ‘फूल मुड्डी’ पार पडली. त्यानंतर संगीत कार्यक्रम पार पडला. गायिका हर्षदीप कौरनं परफॉर्म केलं. गायिका हर्षदीप कौर हीने या संगीत सोहळ्याला चार चाँद लावले होते. इटलीसाठी रवाना होताना हर्षदीपने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.

दीप-वीरचा संगीत आणि मेहंदी कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला. या संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे तसेच पाहुण्यांना सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यास मनाई आहे. बॉलिवूडमधल्या या विवाह सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

यावेळी हर्षदीपने कबीरा, दिलबरो, मनमर्जियां यांसारखी बॉलिवूड सुपरहिट गाणी गायली.

 

harshdeepkaur.jpg

इतकंच नव्हे तर स्वत: रणवीरने दीपिकासाठी खास गाणं गायल्याचं कळतंय. आज (बुधवारी) हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. दीपिका – रणवीर पारंपारिक कोकणी आणि सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *