Wed. Jun 26th, 2019

दीपिका- रणवीरची लगीनघाई, विवाह सोहळ्यासाठी दोघेही इटलीला रवाना

0Shares

बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची ‘लग्नघटिका समीप’ आली आहे. इटलीत होणाऱ्या शाही विवाह सोहळ्यासाठी रणवीर आणि दीपिका इटलीला रवाना झाले आहेत.

रणवीर-दीपिका त्यांच्या कुटुंबीयांसोबत शुक्रवारी मध्यरात्री इटलीला रवाना झाले. निघताना मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर चाहत्यांच्या शुभेच्छांचाही त्यांनी स्वीकार केला. रणवीर-दीपिकाचा शाही विवाह सोहळा इटलीतील लेक कोमोमध्ये 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. त्यानंतर बंगळुरुत 23 नोव्हेंबरला भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. रणवीर आणि दीपिका गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 5 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला, येत्या 14 नोव्हेंबरला दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: