Wed. Dec 8th, 2021

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांकरिता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्यांकरिता रेल्वेने ७२ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, या रेलवेचं आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने अधिकच्या ४० गाड्या सोडणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

कोकणात रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु झाल्यास चिपळूण, संगमनेर आणि तळकोकणात मदत कार्याला वेग येईल त्यामुळे रेल्वे तातडीने पूर्ववत करण्यासाठी काम करण्यात यावे याबाबत दानवे यांनी सूचना केल्या.

रावसाहेब दानवे यांनी ४० गाड्या सोडण्याची घोषणा केल्यामुळे आता गणेशोत्सवासाठी ११२ गाड्या उपलब्ध होणार आहेत. तसेच त्यानंतरही प्रतिक्षा यादी वाढल्यास गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल, असंही दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी कोरोना नियमांचं पालन करूनच प्रवास करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दानवे यांची भेट घेऊन गणेशोत्सवात कोकणासाठी अधिकच्या गाड्या सोडण्याचा विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणवासीयांना तातडीने न्याय दिल्याबद्दल रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे आमदार शेलार यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *