Sun. Sep 19th, 2021

मोदींविरोधात देशभरातले चो* एक झालेत – रावसाहेब दानवे

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी अडचणीत येणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारे वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चो* एक झालेत असे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले आहे.

रावसाहेब दानवेंनी विरोधकांचा उल्लेख चोट्टे म्हणजेच चोर असा केला आहे. त्यांची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जालन्यात प्रभाग क्रमांक 11 मध्ये विकास कामांच्या बैठकीत बोलताना रावसाहेब दानवे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

यावेळी त्यांनी तुम्ही माझ्या मागे उभं राहण्यासाठी मी तुम्हाला पैसे देतो आणि त्यांना (विरोधकांना) पैसे भेटू नाही राहिले असेही वक्तव्य केले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये रावसाहेब दानवे उपस्थितांनी विचारताना दिसत आहेत की, मोदींना पंतप्रधान करणार का ?….पुढे ते म्हणतात की, ‘कोणी काहीही म्हणो काहीही सांगो…देशातले सगळे चो* एक झाले आहेत आणि मोदींना होऊ नका सांगू लागले आहेत.

आपल्याकडेही सगळे चोट्टे एकत्र झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडू असे म्हणू लागलेत. का तर मी मोदींजीचा माणूस आहे’.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे.

‘रावसाहेब दानवे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत हेच कळत नाही. रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आहे.

आपण काय बोलावे याचे भान असले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरुनही पक्षाकडून त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नव्हती.

या निवडणुकीत आम्ही त्यांना उत्तर देऊ’, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *