Sun. Sep 19th, 2021

भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईन मध्ये उभे आहेत – रावसाहेब दानवे

भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईन मध्ये उभे आहेत, राणा जगजितसिंह काल राष्ट्रवादीच्या सभेला गेले नाहीत. तसेच 4 आमदार 31 तारखेला मला भेटायला भोकरदनला येणार आहेत. तिकीट देण्यासाठी आम्ही कोणाला भाजपमध्ये आणलेच नाही.

भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईन मध्ये उभे आहेत, राणा जगजितसिंह काल राष्ट्रवादीच्या सभेला गेले नाहीत. तसेच 4 आमदार 31 तारखेला मला भेटायला भोकरदनला येणार आहेत. तिकीट देण्यासाठी आम्ही कोणाला भाजपमध्ये आणलेच नाही. राजकारणात इच्छा असावी लागते मात्र भाजपने कोणाला तिकिटाचे आश्वासन दिले नाही. असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

रावसाहेब दानवे यांचा दावा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे भाजप प्रवेश होता आहेत. आज रावसाहेब दानवे यांनी राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या आमच्याकडे प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. असे विधान केले आहे. येत्या 31 तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं ही ते म्हणाले आहेत.

या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांनाही लक्ष केलं आहे. अजित पवारांच्या जवळ कोणताच झेंडा उरलेला नाही. त्यामुळे त्यांची अवस्था वाईट झाली आहे. त्यांच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी भगवा झेंडा हाती घेतला आहे. आणि बरेचशे घेण्यास उत्सुक आहेत. असे ते म्हणाले आहेत.

‘राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात ज्यांची नावं असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणारच असे ही ते या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *