Wed. Jun 26th, 2019

‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्या MIMच्या ‘त्या’ नगरसेवकावर आता बलात्काराचा आरोप!

0Shares

‘एमआयएम’ पक्षाचा निलंबित नगरसेवक सय्यद मतीन हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रशीदपूर येथे 35 वर्षीय सय्यद याच्याविरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय.

यापूर्वी ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्याबद्दल सय्यद मतीन वादग्रस्त ठरला होता. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शोकसभेला विरोधही त्याने केला होता. निलंबित असणाऱ्या सय्यदला पक्षातील वरिष्ठांच्या आदेशांना डावलल्याबद्दल पक्षातूनही काढून टाकलं होतं. सय्यदच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. सय्यद यांच्यावर 30 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केलाय. नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून सय्यद मतीनने आपल्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा तिने दाखल केलाय. 15 जानेवारीला सिटी चौक पोलीस ठाण्यात त्या महिलेने गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरु होती.

काय घडलं या महिलेसोबत?

तक्रारदार महिला विवाहित आहे. मात्र पती तिला सोडून गेलाय.

महीलेला दोन मुलं असून ती दोन्ही मुलांसोबत आईकडे राहते.

वर्षभरापूर्वी ही महिला आधार कार्ड बनवण्यासाठी गेली होती.

यावेळी मतीनने त्या महिलेला नोकरी मिळवून देईन असं आश्वासन दिलं.

तसंच लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली.

त्यानंतर रशीदपुरा येथील टाऊन हॉलमधील एका घरात तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास मारून टाकू, अशी धमकीही दिली.

सय्यद मतीनच्या या धमक्यांना न घाबरता पीडितेने पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन मतीन विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार शिनगारे यांना अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले असून त्यांनी मतीनविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस याचा अधिक तपास करत आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: