Mon. Aug 19th, 2019

चेंबूरमध्ये युवतीवर 4 जणांकडून सामूहिक बलात्कार

चेंबूर मधील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवतीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 7 जुलैला हा बलात्कार झाला असून पीडित युवतीने गावी गेल्यावर कुटुंबियांना ही माहिती दिली आणि हा प्रकार उघडकीस आला आहे.

0Shares

चेंबूर मधील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवतीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 7 जुलैला हा बलात्कार झाला असून पीडित युवतीने गावी गेल्यावर कुटुंबियांना ही माहिती दिली आणि हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद येथील बेगमपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो आता मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 19 वर्षीय तरुणीचा भाऊ चेंबूर येथे राहतो त्याच्याकडे ही युवती आली असता हा प्रकार घडला आहे.

नेमकं प्रकरण काय?

7 जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडली. नंतर तिच्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ती घरी परतली आणि झोपली. तेव्हापासून ती आजारी पडली.

तिचे दोन्ही पाय लटलट कापतात, तिला पॅरॉलिसिस झाला असावा, असे सांगून भावाने गावाकडील वडिलांना फोन करून बोलावून घेतले. नंतर गावी उपचार करू असे म्हणून 17 जुलै रोजी ते तिला मुंबईहून गावी घेऊन गेले.

तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावरील उपचाराची कागदपत्रे तपासली आणि तिची तपासणी केली तेव्हा तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत त्यांनी तिच्या आई-बाबाला सांगितले. यानंतर तिच्या आई-बाबांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने तिच्यावर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. मात्र कोणी अत्याचार केले हे तिला सांगता आले नाही. शिवाय तिची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनीही तिच्याकडे अधिक विचारपूस केली नाही.

याविषयी पीडितेच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. 7 जुलै रोजी मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या अत्याचारामुळे घाबरलेल्या पीडितेने या घटनेची वाच्यता केली नव्हती.

आजारी पडल्याने तिला नातेवाईकांनी औरंगाबादेतीलघाटी रुग्णालयात दाखल केले तेव्हा तेथील डॉक्टरांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून तिच्या वडिलांनी याविषयी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *