Wed. Jun 19th, 2019

‘आई समोरचा दादा बॅडगेम खेळतो’ नागपुरात तीन दिवसात दुसरी बलात्काराची घटना

0Shares

लहान मुलीवर होणाऱ्या बलात्कारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आहे. अगदी दोन दिवसापूर्वी नागपुरात एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर आता 13 वर्षीय मुलाचे 5 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेले अनेक दिवसांपासून हा त्या मुलीला त्रास देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

13 वर्षीय मुलाचे 5 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मागील अनेक दिवसांपासून पासून मुलीला देत होता असं ही त्या मुलीकडून सांगण्यात आलं आहे.

मुलीने आईला समोरचा दादा बॅडगेम खेळत असल्याचे सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

तीन दिवसांपुर्वी एका चार वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय मुलाने बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

हा सर्व प्रकार एका प्राथमिक शाळेच्या आवारात घडल्याने खळबळ माजली आहे. नागपूर-अमरावती रोडवरील एका शाळेत हा प्रकार घडला आहे.

अशा घटनांमुळे नागपुरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: