धक्कादायक! विवाहितेवर पाच नराधमांचा सामूहिक बलात्कार

एका विवाहितेवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील अलवर येथे महामार्गावर विवाहितेसोबत हे प्रकार घडला आहे. या पाच जणांनी बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला असून हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या पीडीतेला देण्यात आली होती. या प्रकरणी अपहरण, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार फोन करून धमकी दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

नेमक प्रकरण काय?

एका विवाहितेवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजस्थानमधील अलवर येथे महामार्गावर  हा प्रकार घडला आहे.

यावेळी  बलात्कार करतानाचा व्हिडिओ तयार केला असून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या महिलेला दिली होती.

विवाहिता 26 एप्रिल रोजी तिच्या नवऱ्यासोबत तालावृक्ष येथे दुचाकीवरुन जात होती.

यादरम्यान थानागाजी- अलवर मार्गावर पाच तरुणांनी या दाम्पत्याचा पाठलाग करत गाठले.

चाकूचा धाक दाखवून त्यांनी या दाम्पत्याला निर्जनस्थळी नेले.

तिथे त्यांनी महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. आणि या घटनेचा व्हिडिओ तयार केला.

जर या घटनेबद्दल तक्रार केली तर हो व्हिडीओ व्हायरल करणार अशी धमकी त्या महिलेला देण्यात येत आहे.

शेवटी सोमवारी पीडितेने पोलीस ठाणे गाठत यांच्याविरोधात  तक्रार दाखल केली.

 

 

Exit mobile version