अकोल्यात 10 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार
जय महाराष्ट्र न्यूज, अकोला
अकोल्यात एका चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना शनिवारी घडली. टिळक रोडवरील एका त्रिवणेश्वर कॉम्पेल्समध्ये ही संतापजनक घटना घडली.
पीडित मुलगी परिसरात कचरा उचलण्याचं काम करायची. दरम्यान, एका 50 वर्षांच्या नराधमाने तिला पैश्यांचं आमिष दाखवून चौथ्या मजल्यावर पाठवलं होतं. तिथे दोन नराधम आधीच लपून बसले होते.
पैशाचं नाव काढताचं पीडित मुलगी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर घेतली असता या नराधमांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना रामदासपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं.