Tue. Dec 7th, 2021

…तर पीडितेविरोधातही चालवला जाणार खटला

बलात्काराच्या खटल्यात पीडितेने ऐनवेळी आरोपीला वाचवण्यासाठी आपली साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला तर आता पीडिते विरोधातच खटला चालवला जाऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

एका प्रकरणात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत बलात्कारच झाला नसल्याचं सांगत न्यायालयात साक्ष बदलली होती.

या घटनेचा संदर्भ घेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रंजन गोगोई, नवीन सिन्हा आणि के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठानं हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे.

‘बलात्कार पीडितेकडून वैद्यकीय अहवालाव्यक्तिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव क्लीन चीट देण्याचा किंवा साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला गेला तर पीडितेविरोधातच खटला दाखल केला जाऊ शकतो’,असं गोगोईंच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *