Tue. Sep 17th, 2019

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा ‘मॉब लिंचिंग’द्वारे मृत्यू

0Shares

11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जमावाने जबर मारहाण करून ठार केल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे. पंजाबच्या जालंधर शहरात 39 वर्षीय नराधमाने 11 वर्षीय मुलीवर घरात घुसून बलात्कार केला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत या नराधम आरोपीला जमावाने एवढी जबर मारहाण केली होती, की त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.

काय घडलं नेमकं?

रविवारी पीडित मुलीची आई तिला घरी ठेवून बाजारात गेली होती.

यावेळी शेजारी राहणारा 39 वर्षीय इसम दारूच्या नशेत तर्र होऊन मुलीच्या घरात घुसला.

अवघ्या 11 वर्षांच्या लहानग्या मुलीवर त्या नराधमाने बलात्कार केला.

मुलीची आई जेव्हा घरी आली तेव्हा मुलीला रक्तबंबाळ पाहून ती घाबरली.

मुलीने आपल्याबरोबर घडलेला भयंकर प्रसंग आईला सांगितला.

धक्का बसलेल्या आईने ताबडतोब बाहेर येऊन इतर शेजाऱ्यांना याबद्दल सांगितलं.

संतापलेली आसपासची मंडळी आरोपीकडे पोहोचली.

या सर्वांनी मिळून आरोपी नराधमाला बेदम मारहाण केली.

पोलिसांना या घडनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी आरोपीला ताब्यात घेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र तेथेच या आरोपीचा मृत्यू झाला. हा आरोपी नराधम मूळ बिहारचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *