‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका सुनीलने मित्र आदित्य बिलागीसोबत फोटो केला पोस्ट

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली रसिका सुनील खासगी जीवनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. रसिकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली रसिकाने अभिनयाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शिवाय सोशल मीडियावर जो फोटो पोस्ट केला त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा फोटो पोस्ट केल्यानं नेकऱ्यांच्या मनात सवाल उपस्थित झाला आहे.
रसिकाने मित्र आदित्य बिलागीसोबतचे फोटो पोस्ट केले असून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘दो हजार एक किस.. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. कृतज्ञ राहण्यासाठी दिलेलं कारण तू आहेस, असं म्हणत रसिकाने आदित्यसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या पूर्वी देखील रसिकाचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले होते.
लॉस एंजिलिसमधून रसिकाने हे फोटो पोस्ट केले असून चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याआधी इंडस्ट्रीतील काही कलाकारांसोबत रसिकाचं नाव जोडलं गेलं होतं. पण आता या फोटोंमुळे आदित्य नेमका आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची आदित्यशी ओळख झाली असून या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री इशा केसकरने मालिका सोडल्यानंतर रसिका पुन्हा एकदा शनायाच्या भूमिकेत झळकली होती.