Fri. Dec 3rd, 2021

घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर वाढले

महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच वाढलेले असताना आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. १४ किलोच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात २५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता घरगुती अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ८३४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.

जुलैनंतर आतापर्यंत घरगुती वापरला जाणारा ४.२ किलोग्रामचा सब्सिडी सिलेंडरच्या किंमतीत ७ वेळा वाढ झाली आहे. सरकार सब्सिडी कमी करत प्रत्येक महिन्याला २ रुपये वाढवत आहे. २८ ऑक्टोबरला डीलर कमीशनच्या रुपात दीड रुपये अधिक वाढवला होता. बिना सब्सिडीच्या सिलेंडरचे दर देखील चौथ्यांदा वाढले आहेत. आता पर्यंत चार वेळा एकूण ११८ रुपये वाढले आहेत . १ नोव्हेंबरला ३७.५० रुपये वाढले होते.

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. याआधी १ मे रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. तर एप्रिल महिन्यात १० रुपयांनी दर कमी करण्यात आले. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे दर वाढले होते. दरम्यान या वर्षभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात एकूण १४० रुपयांची वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *