Wed. Dec 1st, 2021

रत्नागिरीतील खेम धरण फुटण्याची शक्यता, धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

रत्नागिरीच्या हर्णे गावाजवळील खेम धरणाची परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे. 1972 साली कोट्यावधी रुपये खर्चून हे धरण बांधण्यात आलं होतं. मात्र, आज धरणाला अनेक ठिकाणी भगदाड पडलं आहे.

 

धरणाची भिंत अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहे. त्यामुळे आसपासच्या हर्णे, पाजपंढरी, अडखल या गावांना धोका निर्माण झाला. गेल्या 4-5 वर्षापासून खेम धरणाची परिस्थिती धोकादायक अवस्थेत आहे. आणि दिवसेंदिवस ती अधिकच नाजूक होत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या धरणाच्या परिस्थितीकडे लक्ष देऊन सुधारणा करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

 

विशेष म्हणजे आमदार संजय कदम यांनी हर्णे गाव दत्तक घेतलं. मात्र, कदमांनीही या धरणाच्या परिस्थितीकडे अद्याप लक्ष दिलेलं नाही. धरणाच्या पाण्यामुळे आसपासच्या 5-6 गावांची पाण्याची गरज भागते. मात्र, आज हेच धरण ग्रामस्थांच्या जीवावर उठलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *