Sun. Aug 1st, 2021

रत्नाकर गायकवाड मारहाण प्रकरणी भारिप कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये आरटीआय आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी भारिप कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या या कारवाईनंतर दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. दादरमधील आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहात आलेले आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिप कार्यकर्त्यांनी टार्गेट केलं होतं.

यावेळी त्यांना बेदम मारहाणसुद्धा करण्यात आली. या मारहाणीनंतर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेत, त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

त्यामुळे आक्रमक दलित कार्यकर्त्यांनी अटक झालेल्या कार्यकरत्यांवर योग्य ती कलमं लावून कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *